एड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांची वर्धा येथे महाएल्गार सभा

Blog

वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हा शाखा च्या वतीने करण्यात आले महाएल्गार सभा चे आयोजन

दि.१८ रोजी उसळणार जनसागर

वर्धा प्रतिनिधी! वंचित बहुजन आघाडी चे नेते ऐड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन समाज घटकातील ओ.बि.सी.अल्पसंख्यांक भटके विमुक्त तथा अनुसूचित जाती व जमाती च्या जनसमुहाला जागृत करण्यासाठी महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यात महाएल्गार सभा चे आयोजन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा मधिल समस्त वंचित बहुजन लोकांना सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागृत करण्यासाठी येत्या दि.१८ रोजी दु.२.००वा.स्थानिक गणेश नगर, बोरगाव (मेघे)लगत च्या क्रिकेट मैदान वर महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली असुन या महाएल्गार सभा ला एड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर, युवा आघाडी अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, एड्.शमीभा पाटील, माजी आमदार डॉ.रमेश गजबज, कुशल मेश्राम,निशाताई शेंडे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१८फेब्रुवारी सन १९२७ रोजी याच दिवशी मुंबई कौन्सिल च्या अधिवेशन मध्ये दलित आणी बहिष्कृत वर्गाच्या लोकांवरील अन्याय दुर करण्यासाठी आमदार पदाची शपथ घेऊन त्यानंतर संवैधानिक रुपाने प्रखर लढा उभारला होता.म्हणुन या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता वंचित बहुजन समाज ची महाएल्गार सभा वंचित बहुजन आघाडी, वर्धा जिल्हा शाखा च्या वतीने आयोजित करण्यात आली असुन या महाएल्गार सभा ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.प्रा.सुभाष खंडारे, जिल्हा अध्यक्ष मनोज वरखेडे, यांचेसह जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातुन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *