तालुका प्रतिनिधी ! पंचायत समिती सेलु अंतर्गत येणाऱ्या बोरी (कोकाटे) या गावाच्या सर्वांगीण विकासाकडे तेथिल ग्राम पंचायत चे निष्क्रिय ग्राम सचिव जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे प्रत्यक्षात दिसुन येत आहे.सविस्तर वृत्त असे की कोणत्याही गावाचा विकास तेथिल सरपंच वार्ड मेंबर तसेच ग्राम सचिव यांच्या समन्वयानेच होत असतो.तेथिल सरपंच जरी विकास कामांसाठी सक्रिय असला तरी ग्राम सचिव हा निष्क्रिय आणी अकार्यक्षम असेल तर त्या गावाचा विकास निश्चितच खुंटला जात असुन विकास कोसो दुर राहतो.असाच प्रकार बोरी (कोकाटे) येथे दिसुन येत आहे.तेथिल ग्राम सचिव आपल्या लहरीपणाच्या वागणुकीमुळे कधी कर्तव्यावर येतो आणी कधी निघुन जातो. हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासुन होत असल्याचे काही ग्रामस्थांकडुन ऐकण्यात
आहे . त्यामुळे बोरी (कोकाटे) गावातील ग्रामस्थ तेथिल ग्राम सचिवामुळे कमालीचे त्रस्त झाले आहे . क्रमशा : भाग (२)