आपल्या भारत देशात ज्या ज्या वेळी अन्याय आणि अत्याचाराची विचारधारा जोरात उभी राहत आली त्या त्या वेळी प्रेम करूणा, मैत्री आणि बंधूभाव जागविण्यासाठी आपल्यातूनच महामानव सेनापतीच्या रूपात पुढे आले आणि त्यांनी ही अत्याचाराची खोटी ढोंगी राक्षसी विचारधारा संपविण्याच्या कामी आपले आयुष्य कुर्बान केले त्यातील –
१) महात्मा गौतम बुद्ध : यांनी मानवतेची शिकवण दिली आणि आपसी कलह पेटवून देणाऱ्यांचा नायनाट केला.
२) महात्मा चक्रधर : यांनी मानवतेचा सर्वाभूती पंचकृष्ण हा मंत्र दिला आणि जाती व धर्म व्यवस्थेने दिलेले शोषण नष्ट केले.
३) वारकरी संत मालिकेतील साऱ्या संतांनी आपल्या जाती जमातींचा अहंकार विठू माऊली समोर त्याग केला आणि निरामय आनंदी जगण्याचा
“हरी मुखे म्हणा, हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी”, हे सांगून ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड केली.
४) मा. जिजाऊ माँ साहेबांनी दि. १९ फेब्रुवारी १६३० ला छत्रपती शिवरायांना जन्माला घालून रयतेचे राज्य आणले आणि धर्ममार्तन्डांनी
केलेल्या खोट्या कर्मकांडाना तिलांजली दिली.
५) टिपू सुलतान :- यांनी भारतातल्या सर्व जाती समुदायांना आनंदी जगता यावं म्हणून ब्रिटीश आणि त्यांना साथ देत असलेल्या ब्राह्मणी व्यवस्थे विरूद्ध संघर्ष केला.
हिन्दूंना आणि मुसलमानांना बरोबरीचा वाटा दिला आणि स्वतःला शेर ए हिन्द साबीत केले.
६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री, शुद्र आणि अतिशुद्रांसाठी शिक्षण सुरू केले आणि चार्तुवर्ण्य व्यवस्था गाडून टाकणारा सार्वजनिक सत्यधर्म दिला.
७) राजर्षि शाहू महाराजांनी सर्वांना माणूस म्हणून ओळखले पाहिजे. ही शिकवण देण्यासाठी आपली राज्य यंत्रणा कामी लावली आणि शोषण
करणारी अघोरी ब्राह्मणी व्यवस्था मोडून टाकली.
८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देवून एका फटकाऱ्यात मनुस्मृतीची सगळी कायदे व्यवस्था जाळूनच टाकली आणि प्रत्येक
भारतीय नागरिकांला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता, बंधूभाव आणि राष्ट्रप्रेम मिळण्यासाठी लोकशाही गणराज्य सरकार दिले.
आमच्या ह्या महापुरूषांनी आपल्या प्रत्येकासाठी ही महान कार्य केलीत. पण आज त्याचे काय झाले ?
आपण आपल्या मताचा अधिकार एक दिवस वापरतो आणि ५ वर्षे चूप बसतो. त्याचा परिणाम त्यांनी धार्मिक सरंजामी सामंतशाही आणि
भांडवलदारी लोकशाही सुरू केली आणि पुन्हा गुलामगिरीच्या मार्गावर आपण चालू लागलो आहोत.
आज सरकारात सरंजामी, सामंतवादी, भांडवलदार, आमदार, खासदार,मंत्री आहेत. प्रशासनात कमिश्नर, कलेक्टर, सचिव ह्या मुख्य पदावर उच्चवर्निय वर्गाचे जास्त प्रतिनिधी आहेत. त्यांचेच इतरांवर वर्चस्व आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठांमध्ये उच्चवर्निय वर्गाचेच कुलगुरू आहेत. अभ्यासक्रम, परीक्षा उच्चवर्नियाच्याच हातात आहेत. सारी न्याय व्यवस्था त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे संविधानातील एका, एका कलमाची ते तोडफोड करीत आहेत. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला तेच आपले मारेकरी ठरत आहेत. ५ टक्के लोक ९५ टक्के लोकांवर राज्य करीत आहेत. आणि आपण आपल्या जाती जातीत देवधर्माच्या नावाने भांडत आहोत. आता हे थांबवलेच पाहिजे.
आपला मतदानाचा अधिकार आपल्या हक्कासाठी वापरलाच पाहिजे. आता एकच आशेचा किरण आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ! त्यांच्या विचारशील कृतिमुळेच, आपण वंचित असलेले लोक सत्तेत येवू शकतात , संविधान वाचवू शकतात ,आपले शिक्षण, रोजगार, व्यवसाय वाचवू शकतात , आपल्या महिलांवर होणारे, अत्याचार थांबवू शकतात . यासाठी निर्धार करून दि. १८ फेब्रुवारी २०२४ ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनात सत्तेची चावी हातात घेण्यासाठी संकल्प करूया!
वर्धा येथे लाखोंच्या संख्येने एकत्र येवून महाएल्गार पुकारूया!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ फेब्रुवारी १९२७ या दिवशीच्या मुंबई कौन्सिलच्या अधिवेशनात दलित आणि बहिष्कृत वर्गाचे अन्याय दूर करण्यासाठी आमदारकीची शपथ घेतली आणि संवैधानिक रूपाने लढा उभारून शपथ पूर्ण करून दाखविली. तशीच शपथ आपण येत्या लोकसभेसाठी आणि येणाऱ्या विधानसभेसाठी घेवू आणि वंचितांच्या हाती सत्ता देण्याचा निर्धार करू !
वंचित बहुजन सारे एक होऊ ।
सत्ता आपल्या हाती घेऊ ॥
भीक नको दामाची । सत्ता हवी घामाची ॥
*प्रा. डॉ. सुभाष खंडारे,
मुख्य संयोजक,
वंचित बहुजन आघाडी,
वर्धा जिल्हा.